Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

40 लाखांचे बाथरूम, मसाज सेंटर अन..'जगन रेड्डी यांचा 500 कोटींचा राजमहाल वादात

40 लाखांचे बाथरूम, मसाज सेंटर अन..'जगन रेड्डी यांचा 500 कोटींचा राजमहाल वादात 


आंध्र प्रदेशात सत्ता परिवर्तन होताच माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी त्यांच्या आलिशान राजवाड्यामुळे चर्चेत आले आहेत. हा बंगला छोटा नसून एकूण ५०० कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये या राजवाड्याची ओळख जगन पॅलेस किंवा जगन महल अशी आहे, सध्या या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

वायएसआर जगन मोहन रेड्डी यांचा हा जगन पॅलेस विशाखापट्टणममधील समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या ऋषिकोंडा टेकडीवर बांधला आहे. यात थिएटर हॉल, 12 आलिशान बेडरूम, प्रत्येकी 15 लाख रुपये किमतीचे 200 झुंबर बसवण्यात आले आहे. या घराच्या इंटेरिअरवर 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या जगन पॅलेसमध्ये लाखो रुपयांची स्पा सेंटर्स आणि लाखो रुपयांची मसाज टेबल्स आहे.

बाथरूमची किंमत तब्बल 40 लाख

यामध्ये 40 लाख रुपये खर्चून फक्त बाथरूम बांधण्यात आले असून प्रत्येकी 12 लाख रुपये किमतीचे कमोड आहेत. हे 9.9 एकर जागेवर बांधण्यात आले आहे. ब्लॉकमध्ये मेजवानीची सुविधा, अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल, रुंद कॉरिडॉर आणि उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था आहे. या राजवाड्यातून समुद्रकिनाऱ्याचे दृश्य अप्रतिम दिसते.

रेड्डी यांचा दावा – जनतेसाठी केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकोंडा टेकडीवर बांधण्यात आलेल्या जगन पॅलेसमध्ये सुमारे सात ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. या इमारतींमध्ये सुपर लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, वायएसआर सरकार ते जनतेसाठी बनवल्याचा दावा करत आहे.
राजवाड्यांची यादी मोठी आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सत्तेत असताना स्वत:साठी आलिशान राजवाडा बांधल्याने चर्चेत होते. अखिलेश यादव यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले आहेत. मायावती सरकारमध्ये असताना त्यांनी आपला खासगी बंगला आलिशान बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.