🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल कार्डीले सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी तर डॉ. अभिजीत चौधरी यांची अमरावती ला बदली?

राहुल कार्डीले सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी तर डॉ. अभिजीत चौधरी यांची अमरावती ला बदली?


सांगली : सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी राहुल कार्डीले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची अमरावतीला बदली झाल्याचे समजते.

राहुल कार्डीले 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ते एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची अमरावतीला बदली झाल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.