Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- कारच्या धडकेत मोटार सायकलस्वार ठार

सांगली :- कारच्या धडकेत मोटार सायकलस्वार ठार 


शिराळा : शिराळातील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळ कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

संतोष उत्तम ताईंगडे ( वय ३५, रा.तळमाऊली, जि. सातारा) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष ताईंगडे हे मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल ( क्र.एम एच ११ ए एस १९५८) वरून निघाले होते. यावेळी कार ( क्र. एम एच ११ ए के २६४८) करण हरिभाऊ सोमोशे ( वय २५ , रा.पलूस ) हे कोकरूड कडून पलूस कडे निघाले होते. यावेळी मोटरसायकल व कारची समोरासमोर धडक होऊन संतोष ताईंगडे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत फिर्याद विजय खांबे दिली असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.