Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

5 वर्ष्याच्या चिमुकलीनं दिला बाळाला जन्म :, ' त्या ' प्रकरणाने अख्खा जगाला केलेलं थक्क

5 वर्ष्याच्या चिमुकलीनं दिला बाळाला जन्म :, ' त्या ' प्रकरणाने अख्खा जगाला केलेलं थक्क 


तुम्हाला माहीत आहे का, की जगातील सर्वात लहान वयाच्या आईने कोणत्या वयात मुलाला जन्म दिला? तिचं वय ऐकून तुम्हाला धक्का बसेल. यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. पण सत्य हे आहे की जगातील सर्वात लहान आईने अवघ्या पाचव्या वर्षी एका मुलाला जन्म दिला.

लीना मेडिना हिचा जन्म 27 सप्टेंबर 1933 रोजी पेरूमधील टिक्रापो या छोट्याशा गावात झाला. लीना ही जगातील सर्वात कमी वयाची डॉक्युमेंटेड आई आहे. लीनाचा जन्म precocious puberty या दुर्मिळ अवस्थेसह झाला होता. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गुप्तांग खूप लवकर विकसित होतात. साधारणपणे, मुलींमध्ये जननेंद्रियांचा विकास वयाच्या 10 व्या वर्षी आणि मुलांमध्ये 11-12 व्या वर्षी सुरू होतो, परंतु लीनाला आठव्या महिन्यापासून मासिक पाळी येऊ लागली. वयाच्या चौथ्या वर्षी तिचे स्तन पूर्ण विकसित झाले होते.

लीना जेव्हा पाच वर्षांची झाली तेव्हा तिचे पोट अचानक वाढू लागले. तिच्या आई व्हिक्टोरियाला वाटलं, की तिच्या मुलीच्या पोटात ट्यूमर आहे. लीनाला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. लीनाची रुग्णालयात तपासणी करण्यात आली आणि रिपोर्टने संपूर्ण जगालाच धक्का बसला. ती पाच वर्षांची मुलगी एका बाळाला जन्म देणार होती. लीना हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा ती आठ महिन्यांची गरोदर होती.
डॉक्टर गेराल्डो लोझाडा यांनी लीनाची केस घेतली. 14 मे 1939 रोजी लीनाने सुमारे सहा पौंड वजनाच्या एका निरोगी मुलाला जन्म दिला. आईच्या गुप्तांगाचा आकार लहान असल्याने शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. त्यावेळी लीनाचे वय पाच वर्षे सात महिने आणि 17 दिवस होते. 1939 मध्ये लीना आई झाली, तो दिवसही मदर्स डे होता हा योगायोगच.

लीनाच्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ मुलाचं नाव गेराल्डो ठेवण्यात आलं. हा मुलगा वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत जगला पण बोन मॅरोच्या आजारामुळे 1979 मध्ये त्याचा मृत्यू झाला. बऱ्याच वर्षांपर्यंत गेराल्डो लीनाला आपली बहीण मानत होता. पण जेव्हा तो 10 वर्षांचा झाला तेव्हा त्याला त्याच्या आईबद्दलचं सत्य कळलं.
लीनाने आपल्या मुलाच्या वडिलांचं नाव कधीच उघड केलं नाही. मात्र, लीनाची स्थिती लक्षात घेऊन तिच्या वडिलांना आरोपी मानलं गेलं. त्याला अटकही झाली पण पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. जेव्हा जेव्हा लीनाला याबद्दल विचारलं जायचं तेव्हा ती शांत व्हायची आणि काहीही बोलत नसायची. जणू काही तिला काहीच कळत नाही... किंवा आठवतही नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.