कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात 61 पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असून त्यामध्ये तीन मुस्लिम महिला तर उर्वरित 58 नागरिक हिंदूधर्मीय आहेत. त्यांच्याकडे दीर्घ मुदतीचा व्हिसा असून त्याच्या आधारे त्यांचे वास्तव्य आहे. पोलिसांकडून परराष्ट्र मंत्रालयाकडे
नियमित अहवाल सादर केला जात असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश
खाटमोडे-पाटील यांनी शुक्रवारी दिली. परकीय व्यक्तींच्या वास्तव्याबाबत
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाची पोलिस दलाकडून कठोर अमलबजावणी केली
जाईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या तरी त्यांच्याबाबतचा आदेश उपलब्ध झाला
नसल्याचेही त्यांनी सांगितले. शहर, जिल्ह्यात व्हिसाच्या आधारे राहात
असलेल्या परकीय व्यक्तींच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रभारी पोलिस
अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आठवड्याला त्यांच्यांकडून
आढावा घेतला जातो, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली असून ठिकठिकाणी बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणा सतर्क आहे, असेही ते म्हणाले. व्हिसाची सवलत काढून घेण्याबाबतचे आदेश नाहीत मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयातून या सर्व संबंधितांना व्हिसाची मुदत, नूतनीकरणाची प्रक्रिया करून घ्यावी लागते. व्हिसाची सवलत काढून घेण्याबाबत कोल्हापूर प्रशासनाकडे कोणत्याही लेखी सूचना उपलब्ध झालेल्या नाहीत. मात्र आदेश येताच कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.