भारतीय हवाई दलात 10वी/12वी पास तरुणांसाठी मोठी भरती ; असा करा अर्ज
भारतीय हवाई दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय हवाई दलात गट क पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीद्वारे विविध भरली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
विशेष या भरतीसाठी नुकतेच दहावी आणि बारावी पास झालेल्या तरुणांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर 15 जून 2025 अर्ज करू शकतात. या भरती द्वारे एकूण 153 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. Indian Air Force Group C Bharti 2025
ही पदे भरली जाणार?
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 14
2) हिंदी टायपिस्ट 02
3) स्टोअर कीपर 16
4) सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) 08
5) कुक (Ordinary Grade) 12
6) पेंटर (Skilled) 03
7) कारपेंटर (Skilled) 03
8) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 31
9) लॉन्ड्रीमन 03
10) मेस स्टाफ 07
11) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 53
12) व्हल्कनायझर 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वयात सूट:
ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी ०३ वर्षे.
एससी/एसटी वर्गातील उमेदवारांसाठी ०५ वर्षे.
शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या उमेदवारांसाठी १० वर्षे. (अनुसूचित जाती, जमातीतील शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी अतिरिक्त ०५ वर्षे आणि ओबीसी श्रेणीसाठी ०३ वर्षे.
निवड प्रक्रिया?
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
कागदपत्र पडताळणी
अर्ज कसा करावा:
पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे "APPLICATION FOR THE POST OF --- AND CATEGORY--- . अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.