Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- सोन्याच्या कर्णवेलांसाठी दोन शेळ्यांचे फाडले पोट

सांगली :- सोन्याच्या कर्णवेलांसाठी दोन शेळ्यांचे फाडले पोट


सोन्याचे कर्णवेल शोधण्यासाठी सोनी (ता. मिरज) येथील एका शेतकर्‍याच्या दोन शेळ्यांचे पोट फाडावे लागले. शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे दोन कर्णवेल सापडले.

मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय येथील दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

मिरज तालुक्यातील सोनी येथील एका शेतकर्‍याच्या मुलींनी त्यांची सोन्याची कर्णवेल ताटात ठेवली होती. त्या ताटात पाणी ओतले होते. त्या शेतकर्‍याच्या दोन्ही शेळ्यांनी ते पाणी पिले. त्या पाण्याबरोबर त्या शेळ्यांनी ती कर्णवेलही गिळली. हे माहीत झाल्यानंतर शेतकर्‍यांनी दोन्ही शेळ्या मिरजेच्या शासकीय पशु दवाखान्यात आणल्या. डॉ. विजय ढोके व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केली. त्या दोन्ही शेळ्यांच्या पोटामध्ये सोन्याचे कर्णवेल सापडले. शेतकर्‍याला सोन्याचे कर्णवेल मिळाले, मात्र त्यासाठी शेळ्यांचे पोट फाडावे लागले.

डॉ. डोके म्हणाले, दोन शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल गिळल्याचा संशय शेतकर्‍याने व्यक्त केला. त्या शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून तपासणी केली. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून कर्णवेल बाहेर काढले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.