उन्हाळ्याच्या दिवसांत पंखा हा प्रत्येकासाठी आवश्यक असतो. पण कधी कधी पंखा जुना झाल्यावर किंवा त्याची देखभाल न घेतल्यावर हवा कमी देतो. यामुळे उकाडा जास्त जाणवतो. पण यासाठी नवीन पंखा खरेदी करायची गरज नाही. फक्त 70-80 रुपये खर्चून तुम्ही तुमच्या
पंख्याला पुन्हा नव्यासारखा करू शकता. कॅपेसिटर बदलणे, ब्लेड्सची सफाई आणि
फिटिंग तपासणे यासारख्या सोप्या युक्त्यांनी पंखा एसीसारखी थंड हवा देईल.
पंख्याची स्पीड का कमी होते?
1. पंख्याच्या ब्लेड्सवर आणि मोटरवर धूळ साचते. यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो. ब्लेड्स जड होतात आणि पंख्याची गती मंदावते.
2. कॅपेसिटर हा पंख्याचा महत्त्वाचा भाग आहे. हा खराब झाला तर पंखा हळू चालतो. साधारण 1-2 वर्षांनी कॅपेसिटर खराब होतो.
3. पंख्याचे बोल्ट सैल झाले असतील किंवा वायरिंगमध्ये बिघाड असेल तर गतीवर परिणाम होतो. कमी व्होल्टेजमुळेही पंखा हळू चालतो.
4. पंख्याच्या बेअरिंगमध्ये ग्रीस कमी झाल्यास किंवा ते खराब झाल्यास पंखा आवाज करतो आणि हळू चालतो.
पंख्याची स्पीड कसे वाढवाल ?
1. पंख्याच्या ब्लेड्सवर धूळ साचल्याने हवेचा प्रवाह अडतो. प्रथम पंख्याचा स्वीच बंद करा. कोरड्या कापडाने ब्लेड्स पुसा. नंतर ओल्या कापडाने हलकेच स्वच्छ करा. यामुळे ब्लेड्स हलके होतात आणि हवेचा प्रवाह सुधारतो. नियमित सफाईमुळे पंख्याची मोटरवर कमी ताण पडतो. याने वीज बिलही कमी येऊ शकतं.2. पंख्याची स्पीड कमी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कॅपेसिटर खराब होणं. कॅपेसिटरची किंमत फक्त 70-80 रुपये आहे. बाजारातून नवीन कॅपेसिटर घ्या. स्वतः बदलायचं असेल तर मुख्य स्वीच बंद करा. जुनं कॅपेसिटर कसं बसवलं आहे, हे नीट पाहा. नवीन कॅपेसिटर तसंच बसवा. यात काही शंका असेल तर इलेक्ट्रिशियनची मदत घ्या. नवीन कॅपेसिटर बसवल्यावर पंखा पुन्हा वेगाने चालेल3. पंख्याचे बोल्ट सैल असतील तर ते स्क्रू ड्रायव्हरने घट्ट करा. पंख्याचा बॅलन्स बिघडल्यानेही गती कमी होते. वायरिंगमध्ये बिघाड असेल किंवा व्होल्टेज कमी असेल तर मुख्य स्वीचची तपासणी करा. गर्मीच्या दिवसांत व्होल्टेज कमी येणं सामान्य आहे. यासाठी स्टॅबिलायझर वापरता येईल.4. पंखा आवाज करत असेल किंवा अचानक बंद पडत असेल तर बेअरिंग खराब झालं असू शकतं. बेअरिंगमध्ये ग्रीस नसेल तर त्यात ग्रीस भरा. बेअरिंग खराब असेल तर ते बदलावं लागेल. हे काम इलेक्ट्रिशियन सहज करू शकतो. यासाठी 100-150 रुपये खर्च येतो.गर्मीच्या दिवसांत पंखा हा सर्वसामान्य माणसाचा सर्वात मोठा आधार आहे. एसी किंवा कूलर प्रत्येकाच्या खिशाला परवडत नाही. पंखा कमी वीज घेऊन जास्त हवा देतो. यामुळे वीज बिलही कमी येतं. पण पंखा नीट चालला नाही तर उकाड्याने हाल होतात. नियमित देखभाल केल्यास पंखा वर्षानुवर्षे चांगली हवा देतो. गर्मीत चांगली झोप आणि आरामदायी वातावरणासाठी पंख्याची स्पीड महत्त्वाची आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.