राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने मान्सूच्या आगमनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. यानुसार यंदा वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्ये मान्सून
संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचे समोर आले आहे. राज्यात मान्सून कधी दाखल
होणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मान्सूनचा प्रवास
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने 13 मे राजी अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला आहे. त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या काही भागात सक्रीय झाला आहे. आता 27 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर 1 जून ते 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. आता मान्सून केरळमध्ये 27 मेपर्यंत, गोव्यात 1 जूनपर्यंत, कोकणात 1 जूनपर्यंत तर मुंबईत 5 जूनपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
राज्यातील 'या' भागात गारपीटीचा इशारा
राज्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.