काहीही खाल्ले किंवा जास्त वेळ झोपल्यावर बरेचदा छातीत जळजळते. त्यामागे अनेक कारणे असतात. जळजळ फार कॉमन आहे म्हणून त्याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र अशी जळजळ सारखी होणे चांगले नाही.
छातीवर त्याचा ताण येऊ शकतो. अनेकदा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत उलट्या
दिशेने येते. असे झाल्यावर आपण म्हणतो अन्न वरवर येत आहे. असे जेवल्यानंतर
किंवा काही गटगट प्यायल्याने होते. वाकताना तसेच चालतानाही छातीत त्रास
जाणवतो. झोपल्यावर आणखीच त्रास होतो.
कधी काही जास्त खाल्याने गॅस होतात तसेच
अपचन होते. त्यामुळेही छातीत जळजळते. अनेकदा लीळ गिळतानाही घशाशी काही तरी
अडकल्यासारखे जाणवते. तोंडाला कडवट चव येते. सतत असे होत असेल तर हृदयाला
त्याचा त्रास होऊ शकतो. जेवल्या-जेवल्या लगेच आडवे पडायची सवय अनेकांना
असते. काहीही खाल्यावर कधीही झोपू नये. पचनाच्या क्रियेत अडथळे निर्माण
होतात. तसेच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवल्यावर
फेरफटका मारा किंवा बसले राहा झोपू नका.
जर सारखा असा त्रास होतो तर याचा अर्थ तुम्हाला मसालेदार अन्न जरी आवडत असले तरी ते पचत नाही. त्यामुळे छातीत जळजळते. आहारात बदल करणे आवश्यक आहे. जास्त चमचमीत तिखट पदार्थ खाणे टाळा. आहारात थंडावा देणारे पदार्थ घ्यायला सुरवात करा. भरपूर पाणी प्या. वजन जर जास्त असेल तरी छातीवर ताण येऊन जळजळ सुरू होते. त्यामुळे वजनाकडे लक्ष द्यावे. वजनामुळे अनेक शारीरिक त्रास होतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवावे.सततची जळजळ म्हणजे पित्ताचा त्रास. पित्तशामक पदार्थ आहारात घ्यायला सुरवात करा. डॉक्टरांशी बोलून योग्य ते उपाय करा. औषधे घ्या तसेच घरगुती साधे उपाय करा. आलेलिंबाचा रस प्या. त्यामुळे गॅस अडकून राहत नाही. तसेच जळजळ कमी होते. बडीशेपेचे पाणी प्या. तसेच ओव्याचे पाणी प्या. रोज छान थंड दूध पित जा. त्यामुळे आराम मिळतो. आहारात ताक असायलाच हवे. पित्तही आटोक्यात राहते आणि जळजळ, मळमळ असे काही त्रास होत नाहीत. अन्न व्यवस्थित पचते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.