फोन टॅपिंग होत असल्याने राज्यातील अधिकारी फोन उचलत नाही.', राष्ट्रवादी शरद पवार गटातील बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप
राज्यात फोन टॅपिंगचा विषय पुन्हा चर्चेत येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. राज्यातील अधिकाऱ्यांच्या फोन टॅपिंगच्या घटना घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. फोन टॅपिंगच्या प्रकारामुळे अर्ध्या
महाराष्ट्रातल्या अधिकारी हे व्हाईस कॉलवर असतात. सचिव, अधिकारी अथवा पोलीस
अधिकारी असो कॉल केल्यावर फोन उचलत नाही, या शब्दात एकनाथ खडसे यांनी
नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटले की, पोलीस अधिकारी असतील, तहसीलदार असो किंवा इतर उच्च अधिकारी यांना फोन केला की ते फोन घेत नाहीत. त्यांचे परत उत्तर सुद्धा येत नाही. अनेक अधिकाऱ्यांना फोन केल्यावर मी व्हिसीमध्ये आहे. बैठकीमध्ये आहे, असे सांगितले जाते. मात्र दिवसभर बैठका चालतात का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा सरकारने केली. मात्र, अजितदादा आता म्हणतात, अशी घोषणा कोणी केली, त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, सरकार आपल्या शब्दापासून मागे जात आहे. 2100 रुपये तर लांब राहिले 1500 रुपये सुद्धा वेळेवर मिळत नाही. राज्य दिवाळखोरीवर आले आहे. कर्जबाजारी झाले आहे. 46 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणी योजनेसाठी लागतात. त्याचा परिणाम इतर योजनांवर झाला आहे. राजीव गांधी योजना, गोपीनाथ मुंडे कृषी योजनेचे पैसे सहा महिन्यांपासून मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारची दिवाळखोरी समोर आली आहे, असे एकनाथ खडसे यानी म्हटले आहे.कर्ज काढायचे आणि लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे, कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार करायचे, अशी आजच्या सरकारची परिस्थिती आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? या प्रश्नावर खडसे म्हणाले की, गेला काय दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चांना कुठलाही अर्थ नाही. एकत्रीकरणाचा कुठलाही संकेत कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या माध्यमातून आलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.