इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या राजकीय तणावामुळे आयपीएलचे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सरकार आणि सुरक्षा संस्थांशी आणि सर्व प्रमुख भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर, बोर्डाने हंगामाचा उर्वरित भाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे २०२५ पासून सुरू होणारे आणि ३ जून २०२५ रोजी अंतिम फेरीत होणार आहे. एकूण १७ सामने ६ ठिकाणी खेळवले जातील. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडरचा समावेश आहे, जे दोन रविवारी खेळवले जातील.
प्लेऑफचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
पात्रता १ - २९ मे
एलिमिनेटर - ३० मे
पात्रता २ - १ जून
अंतिम सामना - ३ जून
प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणांची माहिती नंतर जाहीर केली जाईल. बीसीसीआय पुन्हा एकदा भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करते. ज्यांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेटचे सुरक्षित पुनरागमन शक्य झाले आहे.
सुधारीत वेळापत्रक
१७ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स ( ७.३० वा.) बंगळुरू१८ मे - राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स ( ३.३० वा.) दिल्ली१८ मे - दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स ( ७.३० वा.) जयपूर१९ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद ( ७.३० वा.) लखनौ
२० मे - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, ( ७.३० वा.) दिल्ली२१ मे- मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स ( ७.३० वा.) , मुंबई२२ मे - गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स ( ७.३० वा.), अहमदाबाद२३ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद ( ७.३० वा. ) बंगळुरू२४ मे - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स ( ७.३० वा.) जयपूर२५ मे - गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स. ( ३.३० वा.) अहमदाबाद२५ मे - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स ( ७.३० वा.) दिल्ली२६ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स ( ७.३० वा.) जयपूर२७ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ( ७.३० वा.) लखनौ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.