Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एमआयडीसी प्लॉट खरेदीची सुवर्ण संधी; तुमच्या जिल्ह्यात किती आणि कुठे उपलब्ध? जाणून घ्या अन् आजच करा अर्ज

एमआयडीसी प्लॉट खरेदीची सुवर्ण संधी; तुमच्या जिल्ह्यात किती आणि कुठे उपलब्ध? जाणून घ्या अन् आजच करा अर्ज
 

तुम्हाला एमआयडीसी परिसरात भूखंड खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण, एमआयडीसीने भूखंड वाटप सुरू केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध औद्योगिक क्षेत्रातील वाटपास उपलब्ध असलेले औद्योगिक भूखंड जसे आहेत तसे आणि जेथे आहेत तेथे या तत्त्वावर वाटप करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धोरणानुसार, प्रधान्य / Thrust Sector सदरात मोडणाऱ्या उद्योजकांना वाटप करण्यासाठी 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 12 मे 2025 पर्यंत ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यापैकी काही भूखंडाकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी www.mahatenders.gov.in या वेबसाईटला भेट द्या. जाणून घ्या कोण्या जिल्ह्यातील कोणत्या औद्योगिक क्षेत्रात नेमके किती भूखंड उपलब्ध आहेत.

जिल्हा औद्योगिक क्षेत्र भूखंड संख्या
रायगड विळे - भागाड 4
रायगड रोहा 1
रत्नागिरी गणे - खडपोली 3
रत्नागिरी लोटे - परशुराम 19
सिंधुदुर्ग अडाळी 2
पुणे रांजणगाव टप्पा 1 1
पुणे रांजणगाव टप्पा 3 10
पुणे बारामती टप्पा 2 1
सातारा पाटण 1
सातारा खंडाळा टप्पा क्र. 1 1
कोल्हापूर गडहिंग्लज 1
कोल्हापूर हलकर्णी 6
सांगली शाळगाव - बोंबाळेवाडी 16
सांगली शिराळा विकास केंद्र 3
सोलापूर टेंभुर्णी 1
सोलापूर चिंचोली 6
सोलापूर कुर्डुवाडी 1
सोलापूर मंगळवेढा 1
सोलापूर बार्शी 9
सोलापूर करमाळा 3
नाशिक येवला 2
नाशिक मालेगाव (अजंग रावळगाव) 9
अहिल्यानगर श्रीरामपूर 4
अहिल्यानगर नेवासा 1
धुळे नरडाणा टप्पा क्र. 2 2
नंदुरबार अति. नंदुरबार (भालेर) 17
जळगाव भुसावळ 4
जळगाव चाळीसगाव 4
छत्रपती संभाजीनगर शेंद्रा पंचतारांकित 1
बीड माजलगाव 1
धाराशिव उमरगा 1
नांदेड किनवट 2
नांदेड कृष्णूर 3
परभणी जिंतूर 7
अमरावती अति. अमरावती 3
अमरावती अति. अमरावती टेक्सटाईल पार्क 10
अमरावती धारणी लघु 1
अमरावती चंदुर रेल्वे लघु 1
अमरावती धामणगाव विकास केंद्र 1
यवतमाळ मारेगाव 1
यवतमाळ पुसद विकास केंद्र 1
यवतमाळ दिग्रस लघु 1
अकोला पातूर 1
बुलढाणा मलकापूर 3
वाशिम वाशिम विकास केंद्र 2
नागपूर बुटीबोरी 9
नागपूर बुटीबोरी टप्पा 2 11
वर्धा वर्धा 10
गोंदिया देवरी 4
भंडारा लाखंदूर लघु 1
चंद्रपूर चंद्रपूर विकास केंद्र 5
चंद्रपूर चिमूर 1
चंद्रपूर राजूरा लघु 2
गडचिरोली धानोरा 1
भूखंडाच्या संख्येमध्ये आणि क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राखून ठेवले आहेत. भूखंडाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक निविदा कागदपत्रांमध्ये दिले आहेत. तांत्रिक संपर्क क्र. - 91 8422944043 (सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.