प्रज्ज्वल रेवण्णाच्या फोनमध्ये २००० अश्लील फोटो, महिलांबरोबरचे ४०-५० व्हिडीओ; वाहन चालकाची धक्कादायक साक्ष
कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाली असून त्यावर खटला सुरू आहे. नुकतेच न्यायालयीन सुनावणीदरम्यान रेवण्णाचा माजी वाहन चालक याने न्यायालयात या प्रकरणी साक्ष दिली. त्याने सांगितले की, प्रज्ज्वल
रेवण्णाच्या मोबाइलमध्ये जवळपास २००० अश्लिल फोटो होते. तर ३० ते ४०
वेगवेगळ्या महिलांशी लैंगिक संबंधाचे ४०-५० व्हिडीओ होते.
कार्तिकने म्हटले की, प्रज्ज्वल रेवण्णा त्याचा मोबाइल अधूनमधून लपून पाहायचा. तो मोबाइलमध्ये काय पाहतो, याची मला उत्सुकता होती. २०१९ मध्ये बंगळुरूत असताना प्रज्ज्वल रेवण्णा त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला असताना मोबाइल गाडीतच विसरला होता. त्यावेळी मी चोरून त्याचा मोबाइल तपासला आणि मला धक्काच बसला. रेवण्णाच्या मोबाइलमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे फोटो आणि व्हिडीओ होते.
मी जेव्हा मोबाइल उघडला तेव्हा त्यात
प्रज्ज्वल रेवण्णाने अनेक महिलांशी लैंगिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ चित्रित
केलेले आढळले. व्हिडीओ आणि फोटोतील अनेक महिला या जेडीएस पक्षाच्या
कार्यकर्त्या आणि घरातील मदतनीस होत्या. प्रज्ज्वलच्या मोबाइलमधील डेटा
माझ्या फोनमध्ये मी कॉपी करून घेतला आणि ते सर्व प्रज्ज्वलची आई भवानी
रेवण्णा यांना दाखवले, असा दावाही वाहन चालक कार्तिक एन. याने केला आहे.
व्हिडीओ बाहेर कसे आले?
२०२२ साली कार्तिक आणइ प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या कुटुंबियांचे जोरदार भांडण झाले. ज्यामुळे कार्तिकने त्यांची नोकरी सोडली. कार्तिकने पुढे सांगितले की, प्रज्ज्वल रेवण्णाच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह त्यानेच भाजपाचे नेते आणि वकील जी. देवराजे गौडा यांना दिला होता. त्यांनी हासन विधानसभा मतदारसंघातून प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याचा वाहन चालक कार्तिक एन. २६ एप्रिल २०२४ रोजी हासन लोकसभा मतदारसंघात प्रज्ज्वल रेवण्णाच्या व्हिडीओजची पेन ड्राईव्ह वाटण्यात आली होती. आपण वकील जी. देवराजे गौडा यांना दिलेल्या पेन ड्राईव्हमधीलच अनेक व्हिडीओ यात होते, असेही कार्तिकने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.