Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- ठेकेदाराने लगाविली माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशीलात व लागावली बंदूक:, सांगली महापालिका वर्तुळात खळबळ

सांगली :- ठेकेदाराने लगाविली माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशीलात व लागावली बंदूक:, सांगली महापालिका वर्तुळात खलबळ
 

सांगलीत ठेकेदाराने लगाविली माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशीलात: महापालिकेच्या नालेसफाई कामाची माहिती मागविली म्हणून ठेकेदाराने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. शिवाय ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची चर्चा देखील मनपात रंगली आहे. हा प्रकार मनपा मुख्यालयाच्या आवारात घडल्याने खळबळ उडाली आहे.

पावसाळ्यापूर्व मनपा क्षेत्रात नालेसफाईचे काम करण्यात येते. यासाठी दीड कोटींची निविदा मनपाने काढली आहे. सध्या या नालेसफाईचे काम सुरू आहे. या कामाची संपूर्ण माहिती सांगलीवाडी येथील एका माहिती अधिकार कायकत्यनि अधिकाऱ्याकडे मागितली होती. संबंधित अधिकाऱ्याने हा प्रकार ठेकेदाराला सांगितला. 

ठेकेदाराने महापालिका गाठली. सतत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवत असल्याने ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातून ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला दोन कानशिलात लगाविल्या. तर पुन्हा कामाची माहिती मागविल्यास सोडणार नाही, अशी धमकी देत ठेकेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
 
मनपा मुख्यालय आवारात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. मात्र या घटनेची पोलिसात नोंद झालेली नाही. महापालिकेत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणाऱ्या कार्यकर्त्याला मारण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्त्यांला ठेकेदाराने धमकी दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यां महासंघ मुंबईच्यावतीने निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी बुधवारी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी सावत यानी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.