नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर देशभरातील गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे देशात घडणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टींवर आता गुप्तचर यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशातच हरियाणातील यूट्युबर ज्योती
मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर
खळबळ उडाली आहे. ज्योतीनंतर तपास संस्थांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या
अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्योतीबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत
असतानाच आता आणखी नव्या माहिती खळबळ उडवून दिली आहे. ज्योती मल्होत्राचे
हाफिज सईदच्या संघटनेसोबत कनेक्शन असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
यूट्युबर ज्योती मल्होत्राची एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स मार्फत चौकशी करण्यात आली आहे. ज्योतीने लष्कर ए तैयबाचे ठिकाण असलेल्या मुरिदके येथे जाऊन चक्क 14 दिवस हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले होते. दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय मुरिदके इथे आहे. या ठिकाणी ज्योती मल्होत्रा एकूण 14 दिवस होती. या काळात तिने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे म्हटले जात आहे. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगामचा हल्ला झाला त्याच्या तीन दिवसांआधी ज्योती मल्होत्रा ही काश्मीर येथे गेली होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय आणखीच बळावला होता. त्यानंतर हरियाणाच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यामुळे आगामी काळात या हेरगिरीबाबत आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.पण आता ज्योती मल्होत्राने थेट हाफीज सईद याच्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय मुरिदके इथे हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्योतीचे पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबतचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तर, ज्योतीच्या या गद्दारीबाबत तिच्या वडिलांना सुद्धा कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. कारण, ज्योतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिचे वडील हरिश मल्होत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योती आम्हाला सांगायची की ती दिल्लीला चालली आहे. पण ती नेमकी कुठे जायची हे आम्हाला माहिती नाही. तिने कधी तिच्या मैत्रिणींना घरी आणले नाही. दोन दिवसांपूर्वी घरी पोलीस आले होते. पोलिसांनी ज्योतीचा लॅपटॉप तसेच इतर सामान नेले आहे. ज्योतीदेखील घरी आली होती. बॅगमध्ये काही कपडे घेऊन ती गेली. मला काहीही कल्पना नाही, असे ज्योतीच्या वडिलांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.