ठाणे : येऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत. परंतु ते बंगले का तोडले नाहीत. येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात. तेथे ५०० रुपयांत बलात्कार करण्याची
परवानगी दिली जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार
जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच उत्पादन शुल्क विभाग येथे मद्याचा परवाना
देतेच कसे याचे उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी द्यावे असेही
आव्हाड म्हणाले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर
वन परिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे
उभी राहिली आहेत. येऊरचे जंगल सवेंदनशील क्षेत्र असतानाही अनेकदा
रात्रीच्या वेळेत येथे पार्ट्या आयोजित केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच
येऊरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा येऊरमध्ये
रात्री सुरु असलेल्या पार्ट्या आणि बेकायदा बांधकामांविषयी प्रश्न उपस्थित
झाले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिने पर्यावरणवादी
कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन
केले होते. त्यावेळी येऊरमधील हाॅटेल व्यवसायिकांसोबत त्यांची बाचाबाची
झाली होती.
येऊरच्या बेकायदा बांधकामांबाबत आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आव्हाड हे माध्यमांशी सवांद साधत असताना त्यांनी गंभीर आरोप केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्य परवाना दिलाच कसा जातो. याचे उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावे. अनधिकृत बांधकामामध्ये बारचा आणि मद्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा असतानाही तुम्ही कसा परवाना दिला असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. येऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत. परंतु ते बंगले का तोडले नाहीत. येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात. प्रश्न विचारल्यानंतरही तेथे रात्री लोकांना प्रवेश दिला जात होता. तेथे ५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.