Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट अ‍ॅक्शन

Breaking News! भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट अ‍ॅक्शन
 

अखेर तो क्षण आलाच, भारतीय  सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर'  ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायुदलानं  आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक  करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा  बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

भारतानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवं वळण देत 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत, भारतीय वायूदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.