खोपोली :- नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला पुणे एटीएस युनिटने ३ मे रोजी अटक केली आहे. खालापूर डोणवत परिसरात तो देवमाणसाच्या रुपात शिक्षक म्हणून वावरत होता.
तो नक्षलवादी असल्याचे समजताच या परिसरात खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात २०११ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो तब्बल १४ गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्याला न्यायालयाने फरार घोषित करत निरंतर अटक वॉरंट व जाहीरनामा जारी केला होता. प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप गेल्या ६ ते ७ वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत तीन वर्षे राहिला. नंतर जि.प. शाळेसमोरील इमारतीत राहत होता.
कुटूंबांसोबत राहत नसल्यामुळे तिन्ही वेळचे जेवण हॉटेल, चीयनीजच्या गाडीवर करीत होता. त्याच्याकडे एक स्कुटी होती. परंतु शिक्षकाच्या वेशात आदिवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी जात असल्याने गामस्थांसाठी तो 'देवमाणूस' होता. प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप यांच्याबद्दल पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून ३ मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि ४ मे रोजी अधिकृतपणे अटक केली.सोमवारी (दि.५) त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डोणवत गावात काही वर्षांपासून देवमाणसाच्या रूपावत वास्तव्यास असणारा प्रशांत जालिंदर कांबळे (बनावट नाव सुनील जगताप) नक्षलवादी निघाल्याने खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.