असे म्हणतात की वडिलांना आपल्या मुलींबद्दल विशेष प्रेम असते. एक बाप आपल्या मुलीच्या आनंदासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एक बाप आपल्या मुलीला थंडी वाजत असल्याने 14 कोटी रुपये जाळेल? होय, तुम्ही बरोबर वाचले, ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर एक खरी घटना आहे. एका वडिलांनी 14 कोटी रुपये जाळले, केवळ यासाठी की त्याच्या मुलीला थंडी वाजत होती. या महान व्यक्तीचे नाव होते पाब्लो एस्कोबार. चला जाणून घेऊया सनकी व्यक्तीबद्दल…
पाब्लो एस्कोबार कोण होता?
जगातील गुन्हेगारी विश्वात अनेक नावे अशी आहेत जी त्यांच्या काळ्या कृत्यांमुळे इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली. पण यापैकी जर कोणाचे नाव सर्वात वर घेतले जाते, तर ते आहे पाब्लो एस्कोबार. कोलंबियाचा हा व्यक्ती केवळ ड्रग माफिया नव्हता, तर गुन्हेगारीचा 'किंग' मानला जात होता. त्याची संपत्ती, प्रतिष्ठा आणि दहशतीच्या कथा जगभरात प्रसिद्ध होत्या.
लेकीला हुडहुडी भरली, आणि मग…
पाब्लो केवळ गुन्ह्यांसाठीच नव्हे, तर पैसा उधळण्याच्या त्याच्या पद्धतींसाठीही ओळखला जात होता. एकदा त्याच्या मुलीला प्रचंड थंडी वाजत होती. आजूबाजूला बर्फाळ वारे वाहत होते आणि पाब्लोला त्याच्या मुलीची थरथरणारी अवस्था पाहवली नाही. त्याच्याकडे दोन मिलियन डॉलर (सुमारे 14 कोटी रुपये) रोख होते. त्याने एक क्षणही न दवडता त्या नोटांना आग लावली, जेणेकरून त्याच्या मुलीला थंडी वाजणार नाही.
उंदिरांनी खाल्ले अब्जावधी रुपये
पाब्लोच्या कमाईचा अंदाज यावरून लावता येईल की त्याची रोजची कमाई 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. इतका पैसा होता की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जागा कमी पडत होती. त्याने अनेक गोदामे बांधली, जिथे नोटांचे गठ्ठे पिशव्यांमध्ये भरून ठेवले जात होते. पण तिथेही सुरक्षितता नव्हती. दरवर्षी सुमारे 1 अब्ज रुपयांच्या नोटा उंदीर कुरतडून टाकायचे. असे ही म्हटले जाते की, पाब्लो आपल्या पैशांना रबर बँडने बांधण्यासाठी दर आठवड्याला 1000 डॉलर खर्च करायचा.
फोर्ब्सच्या यादीत गुन्हेगार
1989 मध्ये फोर्ब्स मासिकाने पाब्लो एस्कोबारला जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित केले होते. त्याची एकूण संपत्ती त्या वेळी 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. त्याच्या ड्रग व्यवसायाने जगातील 80% कोकेन व्यापारावर कब्जा केला होता. इतकेच नव्हे तर त्याने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी केवळ पोलिसांनाच नव्हे तर न्यायाधीश, नेते आणि पत्रकारांनाही विकत घेतले होते. त्याच्यामुळे सुमारे 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता.
कसा झाला मृत्यू?
2 डिसेंबर 1993 रोजी एस्कोबारचा अंत झाला. कोलंबियन पोलिसांपासून पळत असताना छतावर गोळ्यांचा वर्षाव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. काही लोकांचे म्हणणे आहे की त्याने स्वत:ला गोळी मारुन घेतली होती. त्याला अटक करण्यात कधीही पोलिसांना यश आले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.