Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

4 वर्षात 750 इंजेक्शन, दारुच्या व्यसनामुळे घरातच अंथरुणाला खिळून, अनिल कपूरच्या नायक सिनेमातील व्हिलनचे प्रचंड हाल

4 वर्षात 750 इंजेक्शन, दारुच्या व्यसनामुळे घरातच अंथरुणाला खिळून, अनिल कपूरच्या नायक सिनेमातील व्हिलनचे प्रचंड हाल
 

इंडस्ट्रीवर एकेकाळी राज्य करणारा एक दिग्गज अभिनेता होता. मात्र परिस्थिती अशा वळणावर आल्या की आज ते खूप वाईट काळातून जात आहेत. असेच एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, ज्यांनी खलनायक म्हणून अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका बजावल्या. साउथसह हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी सुनील शेट्टीच्या 'रक्षक' या चित्रपटात काम केलं, तसेच अनिल कपूरच्या 'नायक'मध्येही झळकले.

मात्र आजच्या काळात ते अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत. हे दुसरे तिसरे कोणी नाही, तर प्रसिद्ध खलनायक अभिनेता पोन्नम्बलम आहेत. त्यांना दारूची व्यसन लागलं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मूत्रपिंडांची कार्यक्षमपणा गमावली. किडनी फेल झाल्यामुळे सध्या ते अंथरुणावर आहेत. पोन्नम्बलम यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून लक्षवेधी अभिनय केला आहे. तमिळसह त्यांनी मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. 1988 मध्ये प्रभू यांच्या 'कलियुगम' या चित्रपटातून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 'अपूर्व सहधरंगल', 'वेत्री विझा', 'मिचल मदन कामराजन' आणि 'मननगर कवल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.


ते फक्त अभिनेता नव्हते, तर त्यांनी स्टंटमन म्हणूनही काम केलं आहे. स्टंट करताना इतकी सफाई होती की त्यांना कधीही दुखापत झाली नाही, त्यामुळे त्यांना 'स्पेअर पार्ट्स' हे टोपणनाव मिळालं. सरथकुमारच्या 'नादमई', 'कुली' आणि रजनीकांतच्या 'मुथु' या चित्रपटांतील त्यांच्या खलनायकी भूमिकांना विशेष प्रसिद्धी मिळाली. १९९९ मध्ये त्यांनी तब्बल 10 चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांत, कमल हासन, अजित, विजय, सत्यराज आणि विजयकांत यांसारख्या सुपरस्टारसोबत काम केलं. हिंदीमध्ये त्यांनी जरी 3-4 चित्रपटांमध्येच काम केलं असलं, तरी त्यांचं चेहरा पाहताच प्रेक्षक त्यांची भूमिका आठवतात. 'नायक' मध्ये त्यांनी 'रंगा'ची भूमिका साकारली होती आणि 'रक्षक' मध्ये त्यांनी क्रूर खलनायकाची भूमिका केली होती.

तमिळबरोबरच त्यांनी तेलुगु, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्येही काम केलं. पोन्नम्बलम यांना शेवटचं 2022 मध्ये आलेल्या 'कटेरी' या चित्रपटात पाहण्यात आलं. त्यानंतर ते गंभीर आजारामुळे कॅमेऱ्यासमोर येऊ शकले नाहीत. दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे सध्या ते डायलिसिसवर आहेत. आपल्या आजाराविषयी बोलताना पोन्नम्बलम म्हणाले होते, "जेव्हा मी रुग्णालयात होतो, तेव्हा सरथ कुमार यांनी माझ्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर काही इतरांनीही मदतीचा हात दिला. घरात आर्थिक संकट आलं, तेव्हा धनुषने मदत केली. आणि जेव्हा संकट गडद झालं, तेव्हा अभिनेता अर्जुननेही माझी मदत केली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी फक्त एक वर्ष जगू शकेन. डायलिसिस ही जगातील सगळ्यात क्रूर शिक्षा आहे."

ते पुढे म्हणाले, "माझं डायलिसिस एक दिवसाआड चालतं. गेल्या चार वर्षांपासून मी एकाच जागी 750 इंजेक्शन घेतले आहेत. हे खूपच कठीण आहे. मी मीठ घालून खाऊ शकत नाही. पोटभर जेवणही खाऊ शकत नाही. माझ्या शत्रूंनाही अशी अवस्था होऊ नये. माझं लग्न होऊन 25 वर्ष झालीत, पण आजवर मी माझ्या कुटुंबाला रुग्णालयात बोलावलेलं नाही. मी घरी एकटाच आहे." पोन्नम्बलम यांनी हेही सांगितलं की, "आतापर्यंत मी उपचारांसाठी 35 लाख रुपये खर्च केले आहेत. अभिनेता चिरंजीवी यांनी मला पैसे देऊन मदत केली. मात्र अनेक कलाकारांनी विचारलेही नाही की मी कसा आहे. एकदा शूटिंगदरम्यान माझा चिरंजीवीसोबत वाद झाला होता, पण त्यांनी सगळं विसरून मला मदत केली."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.