Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; मालकी हक्क उतारे वाटपास मंजुरीचे आदेश:, आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; मालकी हक्क उतारे वाटपास मंजुरीचे आदेश:, आमदार सुधीरदादा गाडगीळ 
 

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; मालकी हक्क उतारे वाटपास मंजुरीचे आदेश तसेच पाणीपट्टी थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा – १००% विलंब व्याजमाफी होणार : आमदार सुधीर दादा गाडगीळ* सांगली, दि.०१ ऑगस्ट  २०२५ –  मुंबई येथे  मंत्रालयात सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी व गुंठेवारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, सांगलीचे कार्यसम्राट आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीत सांगली महापालिका क्षेत्रातील २०११ पर्यंतच्या सर्व झोपडपट्यांचे रेखांकन (लेआउट) खाजगी एजन्सीमार्फत पूर्ण करून, त्यानंतर संबंधित नागरिकांना मालकी हक्काचे उतारे/सिटी सर्वे सातबारा तीन महिन्यांच्या आत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. मालकी हक्क उतारे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात वाटप करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देत कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.

तसेच, गुंठेवारी कायदा अधिनियम 2001 अंतर्गत अनेक नागरिकांनी खाजगी मालकांकडून जागा खरेदी करून नोटरी करारपत्र व कब्जेपट्टीच्या आधारे मनपाकडून गुंठेवारी प्रमाणपत्र, घरपट्टी व पाणीबिल आपल्या नावावर करून घेतले आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर त्यांची नोंद नसल्यामुळे त्यांना सरकारी गृहसुविधा योजनांचा लाभ मिळत नाही. यावर उपाय म्हणून शासन लवकरच नवीन SOP (Standard Operating Procedure) जाहीर करणार असून, नोटरी करारपत्राच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नाव कसे लावता येईल, यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीस महसूल विभागाचे सचिव श्री. विकास खारगे, सहसचिव श्री. अजित देशमुख, उपसचिव श्री. संजय धारूरकर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन व गुंठेवारी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महासभेने ठराव क्र. ५७७ (दि. २०.०७.२०२३) द्वारे अशा नागरिकांना जे संपूर्ण थकबाकी एकरकमी भरतील, त्यांना विलंबाच्या करामध्ये १००% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी नगरविकास विभागाकडे २०.०९.२०२३ रोजी सादर करण्यात आला होता. यासंदर्भात नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा होऊन, थकीत पाणीपट्टीची रक्कम एकरकमी भरणाऱ्या नागरिकांना सुमारे १९ कोटी ६६ लाख रुपये इतक्या विलंब व्याजामधून १००% सवलत देण्याचा निर्णय झाला आहे. दोन दिवसांत महापालिकेला याबाबतचा शासन निर्णय प्राप्त होऊन, त्यानंतर लवकरच अमलबजावणी करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसं जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, सुनील भोसले, अमर पडळकर, शहाजी भोसले, रवींद्र सदामते, श्रीराम अलाकुंटे, अतुल माने, माजी नगरसेविका स्नेहल सावंत आदी  मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.