सांगली, 1 दि.: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी त्यांना आदरांजली वाहिली. येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार गाडगीळ यांनी अभिवादन केले.
आमदार गाडगीळ यावेळी म्हणाले,अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान फार मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्या तडफदार आणि प्रभावी अशा शाहिरीमुळे जनजागृती झाली. त्यांनी कामगार वर्गाचे सुद्धा नेतृत्व केले. त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.यावेळी उपस्थित साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मोहस्तव समिती अध्यक्ष उत्तम दादा मोहिते. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे. माजी नगरसेवक सुबराव तात्या मद्रासी. माजी सभापती उत्तम आबा कांबळे. कुणाल संकपाळ. देवधर सांगले. आणि इतर समाज बांधव समितीचे पदाधिकारी मोठया संखेने उपस्थित होतें..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.