Breaking News! मंत्र्याला पळवून पळवून हाणलं, गावकरी एक किलोमीटर
मागे लागले, जीव मुठीत घेऊन सर्वच पळाले, कुठं घडली घटना, झालं तरी काय?
बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि विधानसभेचे आमदार कृष्ण मुरारी ऊर्फ प्रेम मुखिया यांच्यावर गावकऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षक आणि एक पोलीस शिपाई जखमी झाला. गावकऱ्यांनी त्यांचा दूरपर्यंत पाठलाग
केला. तर मंत्री महोदयांना जीव मुठीत घेत काही किलोमीटर पळावे लागल्याची
माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रशासन आणि यंत्रणा
गोंधळून गेली. मंत्र्यांना वाहनात बसण्याची संधी सु्द्धा गावकऱ्यांनी दिली
नाही. या संकटातून अखेर मंत्री महोदय सहीसलामत बाहेर पडले.
काही दिवसांपूर्वी पाटणाजवळील
शाहजहांपूर पोलीस ठाण्यातंर्गत एक भीषण अपघात झाला होता. त्यात 9 लोकांना
प्राण गमवावे लागले होते. त्यात नालंदा जवळील हिलसा ठाण्यातंर्गत येणाऱ्या
मलावा या गावातील लोकांचाही समावेश होता. मृतांच्या नातेवाईकांनी
भेटण्यासाठी मंत्री श्रवण कुमार मलावा गावात पोहचले. पण ते येताच
गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वच गांगारले. त्यांना वाहनं तशीच सोडून पळावे
लागले. मंत्र्यांच्या मागे गावकरी लागले. मंत्र्यांना गावकऱ्यांनी एक
किलोमीटर पळवले. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक आणि पोलीस जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच या गावाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
श्रवण कुमार यांना असे पायीच परत जावे लागले गुंडांच्या हल्ल्याचा दावा
मंत्री महोदय या मलावा गावात पोहचले. त्यांनी अपघातात मृत कुटुंबाची भेट घेतली. ते गावात जवळपास 20-25 मिनिटे थांबले. ते ताफ्याकडे वळाले. तेव्हा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना जीव वाचवण्यासाठी मग धावावे लागले. काही गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. हे सर्व गावातील बदमाश लोकं होती असा दावा मंत्र्यांच्या जवळील व्यक्ती करत आहेत. प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. काही जण रस्त्यांची दुरावस्था आणि विकासाकडे कायम दुर्लक्ष यामुळे नाराज होते, त्यातूनच ही घटना घडल्याचे मानले जात आहे. या घटनेने नितीश कुमार सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहे. या घटनेने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.