मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी या विषयावर 'चलो मुंबई' चा नारा दिलाय. लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलाय. तसंच जरांगे यांनी आता मुंबईच्या दिशेनं कुच केलीय. त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. अगदी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात 'जरांगे फॅक्टर' देखील एक मोठं कारण होतं.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण
आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. पण, या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी
कोण आहेत? याची फारशी कुणाला माहिती नाही. जरांगे यांच्या आंदोलनाची
जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्यानं सांभळतायत. जरांगे यांचे विश्वासू
सहकारी कोण आहेत? त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे? याची माहिती
आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1) श्रीराम कुरणकर
मनोज जरांगे यांचा सर्वात विश्वासू सहकारी. शिवबा संघटनेच्या स्थापनेपासूनचे जुने सहकारी. कुरणकर यांचा कोपर्डी आंदोलनातही सहभाग होता. कुरणकर हे जरांगे-पाटील यांचे बाल मित्र आहेत. प्रशासकीय कामे, मंत्र्यांचे संपर्क, फोन,महत्वाचे निरोप हे विषय ते हाताळतात.
2) दादासाहेब घाडगे
दादासाहेब
घाटगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मित्र आहेत.
जरांगेंच्या अंतरवाली सराटी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत.
3) संजय कटारे
संजय
कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोनात जरांगे पाटील यांचे जवळचे
सहकारी आहेत. गोदा काठच्या 123 गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते
ओळखले जातात. या आंदोलनाचं सर्व नियोजनाची कामं कटारे करतात.
4) रमेश काळे
रमेश
काळे हे वडीवाळा गावाचे सरपंच आहेत. ओबासी वर्गातील असूनही ते जरांगे
यांचे कट्टर सहकारी आहेत. ते अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्या सोबत राहणारे
सहकारी आहेत.
5) पांडुरंग तारख
अंतरावली
सराटी या गावचे सरपंच असलेले पांडुरंग तराख हे देखील जरांगे पाटील यांचे
निकटवर्तीय आहेत. सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग
असतो.
6) गंगाधर काळकुटे
गंगाधर
काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे
विश्वासू सहकारी आहेत. जरांगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी
त्यांच्यावर असते. तसंच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं काम ही काळकुटे
सांभाळतात.
7) नारायण शिंदे
नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाचे नियोजन, त्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते.
8) प्रदीपदादा सोळुंके
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसंच त्यांच्या सभेच्या नियोजनाचं काम प्रदीपदादा सोळुंके पाहतात
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.