बीटेक केलं, नंतर UPSC केली क्रॅक; थेट मुख्यमंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या IPS चंदना दीप्ती आहेत तरी कोण?
प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. असंच काहीसं चंदना दीप्ती यांनी केलं. चंदना डीप्ती या एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्या निडर अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दीप्ती चंदना यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ५५१ रँक प्राप्त केली.
शिक्षण
चंदना दीप्ती या मूळच्या तेलंगणातील वारंगळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे बालपणदेखील तिथेच गेले. चंदना दीप्ती यांनी आंध्र प्रदेशमधील गुड शेफर्ड शाळेतून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात बी.टेक पदवी प्राप्त केली.
दीप्ती या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परीक्षादेखील पास केली. आज त्या आयपीएस अधिकारी म्हणून रुजू आहेत. चंदना दीप्ती या उत्कृष्ट डान्स आणि उत्तम तेलुगु लेखिकादेखील आहे. त्या नेहमी कामातून वेळ काढत आपला छंद जोपासत असतात. चंदना यांची तेलंगणामध्ये खूप लोकप्रियता आहे. त्यांचे सोशल मीडियावरदेखील लाखो फॉलोवर्स आहेत. त्या नेहमी सोशल मीडियाद्वारे फोटो पोस्ट करत असतात. त्या कामाच्या व्यापातून वेळ काढत वाचण करतात. टेनिससारखे गेम खेळतात.
मुख्यमंत्र्यांना दिलं होतं लग्नाचं आमंत्रण
चंदना दीप्ती यांनी थेट आपल्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के.सी. राव यांना लग्नासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या आंध्र प्रदेशची सून होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.