Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! अजितदादा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत, दिला थेट आदेश!

Breaking News ! अजितदादा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत, दिला थेट आदेश!
 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष कामाला लागेल आहे. तसेच पदाधिकाऱ्यांकडूनही जोमात तयारी केली जात आहे. काही ठिकाणी तर नेते, पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीला पहिला दणका देण्याच्यात तयारीत आहेत. पुण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे.


पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
राज्यात मुंबई महापालिकेप्रमाणेच पुणे महानगरपालिकेलाही तेवढेच महत्त्व आहे. ही पालिका अजित पवार यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. एका अर्थाने पुणे पालिका अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळेच ते ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. अशाच एका बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अजितदादा नेमकं काय म्हणाले?

पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. पुणे पालिका हद्दीत प्रभागांची रचना भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेला पुरक ठरेल अशी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्याबाबतही अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. प्रभागरचनेला आव्हान देण्यासाठी आपण न्यायालयात जाणार नाहीत. कोणतीही तक्रार न करता निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

अजितदादांचा स्वबळाचा नारा?
तसेच, पुणे पालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की अजितदादा स्वबळाचा नारा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आणखी एका आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी सर्वच जागांसाठी तयारी करावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांची स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीही कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असा संदेशच एका प्रकारे दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.