पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ समिटसाठी चीन दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चीन सरकारने विशेष स्वागत केलं. पाच वर्षानंतर मोदी आणि जिनपिंग यांच्यात बैठक झाली. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनची होंगची कार देण्यात आली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग त्यांच्या अधिकृत दौऱ्यांसाठी ही कार वापरतात.
होंगची एल५ कारला रेड फ्लॅग नावानंही ओळखलं जातं. शी जिनपिंग २०१९ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी या कारचा वापर केला होता. ही कार चीनची प्रतिकात्मक कार मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या चीन दौऱ्यात याच होंगची कारचा वापर करत आहेत. होंगची कार चीनची सरकारी कंपनी असलेल्या फर्स्ट ऑटोमोटिव्ह वर्क्स तयार करते. या कंपनीनं १९५८ मध्ये त्यांची पहिली कार लाँच केली होती. ती कार कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी तयार करण्यात आली होती.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हेसुद्धा एससीओ समिटसाठी तिआनजिनला आले आहेत. पुतीन त्यांची प्रेसिडेन्शियल कार Aurus घेऊन चीनमध्ये आले आहेत. त्याच कारने पुतीन यांचा चीन दौरा सुरू आहे. ही कार रशियन ऑटोमोबाईल कंपनी Aurus Motorsकडून तयार केली जाते. रेट्रो-स्टाइल लग्झरी फिचर्स असणाऱ्या या कारला चीन दौऱ्यासाठी चीनचा डिप्लोमॅटिक नंबर देण्यात आलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.