राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेतला आहे. सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची घोषणा जयंत पाटील, विश्वजीत पाटील आणि विशाल पाटील यांनी केली. महाविकास आघाडीच्या घोषणेनंतर सांगलीत सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट आणि राजू शेट्टी आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.'निवडणूक घेतल्या पाहिजेत, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर ज्यांना आपल्या मागे लोक आहेत,असा आत्मविश्वास आहे. त्यांनी बॅलेटवरच निवडणुका करण्याचा आग्रह केला पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला लगावला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकींबाबत मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्यावी,अशी मागणी देखील जयंत पाटील यांना केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.