Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :- भाजप शहराध्यक्षाच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल; कोठडीत रवानगी!

मुंबई :- भाजप शहराध्यक्षाच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल; कोठडीत रवानगी!
 

बदलापूर :- भाजप महिला पदाधिकाऱ्या असलेल्या प्रतिभा जाधव यांच्या मुलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव ही प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. प्रतिभा हिनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बदलापूर पोलिस ठाण्यात मृणाल जाधव हिच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज देण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृणाल जाधव हिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिभा जाधव यांच्याकडे भाजपच्या बदलापूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती. या घटनेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मुलीच्या कृत्याबद्दल माफी मागत नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
मुलीवर कारवाई झाली

आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत सांगितले की,बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे.

अशा कृत्याला माफी नाही
प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही, असे देखील चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.