Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'चांगभलं'च्या गजरात जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता; महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमधील दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

'चांगभलं'च्या गजरात जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता; महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमधील दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन
 

तिबा डोंगर (कोल्हापूर) : जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी महादेव, बद्रिकेदार, काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं... अशा जयघोषात श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली. जोतिबा डोंगर आजही हाउसफुल्ल झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे अडीच लाख भाविकांनी काल डोंगरावर हजेरी लावली.

माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेदरम्यान येणाऱ्या रविवारी खेटे करण्याची परंपरा असून, यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात. सोमवार होळी पौर्णिमेचा होळी सण असल्यामुळे कोल्हापूरच्या बहुतांशी भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी गर्दी केली होती. चांगभलंच्या जयघोषाने डोंगर दणाणून गेला मंदिर परिसर गुलालात न्हावून गेला. गर्दीमुळे आज मिनी डोंगरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. परराज्यातील भाविक तर गुलालात माखले. त्यांनी मंदिर परिसरात शिखरांवर गुलाल उधळला. शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने काल पहाटे तीन वाजल्यापासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली. 
 
मुख्य मंदिरात पाद्यपूजा काकडआरती व मंगल पाठ झाले. त्यानंतर केदार कवच केदार महिमा केदार स्तोत्र या विधींचे पठण झाले. सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा देवाची अंलकारीक महापूजा बांधण्यात आली. दुपारी बाराला धुपारती सोहळा झाला. रात्री भव्य असा पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल खोबरे पुष्पवृष्‍टी उधळण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.
सासनकाठीधारकांची गुरुवारी बैठक

जोतिबा चैत्र यात्रेत सहभागी होणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हातील मानाच्या सासनकाठी धारकांची बैठक गुरुवारी (ता. ५) दुपारी तीन वाजता मंदिर परिसरातील दर्शन मंडपात होणार आहे. त्यांना प्रांताधिकारी, तहसीलदार, देवस्थानचे सचिव, गटविकास अधिकारी हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी चैत्र यात्रा काळातील अडीअडचणींविषयी चर्चा केली जाणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.