Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवठेमहांकाळ पं. स वर आमदार गटाची सत्ता : सभापतीपदी सिंधुताई पाटील, उपसभापतीपदी वामन कदम बिनविरोध

कवठेमहांकाळ पं. स वर आमदार गटाची सत्ता : सभापतीपदी सिंधुताई पाटील, उपसभापतीपदी वामन कदम बिनविरोध


कवठेमहांकाळ: कवठेमहांकाळ पंचायत समितीवर आमदार रोहित आर आर पाटील गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या सिंधुताई गजानन पाटील यांची, तर उपसभापती पदी वामन विलास कदम यांची बिनविरोध निवड झाली.



निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या सभागृहात निवडीची प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीच्या निवडणुकीत आठ पैकी पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)चे निवडून आले असून तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.

सभापती आणि उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, पदाधिकारी तसेच नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रोहित पाटील यांच्या सूचनेनुसार सिंधुताई पाटील आणि वामन कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती पदासाठी सिंधुताई पाटील आणि उपसभापती पदासाठी वामन कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजया यादव यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, संजय पाटील, महेश पवार, दत्ताजीराव पाटील, हायूम सावनूरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास चंद्रकांत हाक्के, दादासाहेब नारायण कोळेकर, संजय निवृत्ती बनसोडे, पंचायत समिती सदस्य रविकिरण सुबराव घागरे, दिलीप भाणूदास झुरे, अर्जुन गोपाळ कर्पे, वैशाली रामचंद्र माने, प्रियंका अर्जुन गेंड, प्रभावती माणिक निकम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.