Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा परिषदेमध्ये मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या नवीन अटीने भाजप चिंतेत; जयंत पाटलांना संधी?

सांगली जिल्हा परिषदेमध्ये मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या नवीन अटीने भाजप चिंतेत; जयंत पाटलांना संधी?
 

सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकी कोणाचा अध्यक्ष होणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहे. महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवलेल्या अटीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक मिरजेतील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेत सव्वा वर्ष अध्यक्षपद देईल. त्याच पक्षाला पाठींबा द्यायचा, असा निर्णय जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या या अटीमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जयंत पाटील त्याचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीच्या अटीमुळे जयंत पाटील यांना सत्तास्थापन करण्याची संधी असल्याचे देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित घोरपडे यांनी सत्ता स्थापने बाबत कोणाला पाठींबा द्यायचा याचा निर्णय आम्हाला घ्यायचा असून सर्व घडामोडींविषयी पक्षाध्यक्षांना भेटून माहिती देणार आहोत, असे एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.
सांगलीतील सत्ता समीकरणाचे गणित

सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 18 आणि काँग्रेसकडे 11, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 अशा एकूण 30 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. महायुतीमध्ये भाजपकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि शिवसेनेकडे 7 जागा आहेत. रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्यकडे प्रत्येक 1 अशा 31 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अटीमुळे सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.