दहावीच्या २ उत्तर पत्रिका बाहेरून सोडवून आणल्या, अमरावतीमधील धक्कादायक प्रकार; २ अधिकारी अटकेत
अमरावती: दहावीच्या इंग्रजी विषयाच्या दोन उत्तर पत्रिका बाहेरून सोडवून आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटीचेहे प्रकरण समोर आले आहे. अंजनगाव सुर्जी येथील गटशिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी शिक्षण या दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. २७ फेब्रुवारीला दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर पार पाडला असताना चक्क उत्तर पत्रिकाच बाहेरून सोडवून आणण्याचा हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दहावीचा इंग्रजीचा पेपर हा ११ ते २ या वेळेमध्ये पार पडला. त्यावेळी अमरावतीच्या उपशिक्षण अधिकारी यांच्या भरारी पथकाने ३:३० वाजता अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालय येथील पेपर कलेक्शन सेंटरवर धाड टाकली असताना एकूण किती विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली आणि किती उत्तर पत्रिका आहे हे जेव्हा तपासणी केली तेव्हा त्या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत एक इंग्रजी विषयाचा आणि एक उर्दू विषयाचा असे दोन उत्तर पत्रिका त्या ठिकाणी कमी आढळून आल्या. त्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे आणि विस्तार अधिकारी सुनिल कुमार अभ्यंकर यांना विचारले असता त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. त्याचवेळी उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाला पेपर कलेक्शन कस्टडी सेंटरमध्ये एक व्यक्ती हा संशयास्पद आढळून त्या संशयित व्यक्तीला बोलावले असता तो या ठिकाणी हमालीचे काम करतो असे सांगण्यात आले. मात्र त्याच्या शर्टच्या आतमध्ये ते दोन पेपर खोसलेले आढळून आले. त्यावेळी जे दोन पेपर कमी होते तेच पेपर हमालाकडे असलेले पेपर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते पेपर हमालाकडे कसे काय गेले? असा प्रश्न उपस्थित होत असताना ते दोन्ही पेपर बाहेरून सोडवून आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे ते दोन पेपर परीक्षा केंद्रावरून कधी बाहेर गेले? त्यांच्यासोबत प्रश्नपत्रिका देखील बाहेर गेल्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर दुपारी २ वाजता संपलेला पेपर साडेतीन वाजेपर्यंत कस्टडी सेंटरवर यायला पाहिजे आणि पाच वाजेपर्यंत ते सीलबंद व्हायला पाहिजे मात्र तसे झाले नसल्याने या संपूर्ण प्रकारात गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे, विस्तार शिक्षण अधिकारी सुशील अभ्यंकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षणाधिकारी सुधीर खोडे विस्तार अधिकारी सुनील अभ्यंकर आणि हमाल अनिल हाडोळे यांच्यासह दोन अज्ञात विद्यार्थ्यांवर अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात उपशिक्षण अधिकारी यांच्या पथाने तक्रार करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे व अनिल हाडोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखी तीन आरोपी फरार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे त्या दुसरीकडे दहावीच्या विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.