Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-वीरेंद्रसिंह, प्राजक्ता नवदाम्पत्याचा मुंबईत शानदार स्वागत सोहळा

सांगली :- वीरेंद्रसिंह, प्राजक्ता नवदाम्पत्याचा मुंबईत शानदार स्वागत सोहळा



सांगली : भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांचे पुत्र वीरेंद्रसिंह आणि चि. सौ. कां. प्राजक्ता यांच्या सांगलीतील शाही विवाह सोहळ्यानंतर मुंबई येथे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आणि पाटील कुटुंबीयांशी संवाद साधला. याप्रसंगी पृथ्वीराज पाटील, विजया पाटील, अजित पाटील, सुवर्णा पाटील, रोहिणी पाटील, ऋतुराज पाटील, जयमाला पवार यांनी कुटुंबीयांच्यावतीने स्वागत केले. पृथ्वीराज पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढल्याचे सांगितले.

या सोहळ्यात खासदार पार्थ अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंगलप्रभात लोढा, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आबिटकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जयदत्त क्षीरसागर, आ. जयंत पाटील, आ. अमित देशमुख, आ. प्रवीण दरेकर, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, आ. प्रसाद लाड, आ. अमीन पटेल, आ. सत्यजित तांबे, आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजित देशमुख, आ. हेमंत ओगले, आ. इद्रिस नायकवडी, आ. चंद्रदीप नरके, आ. अशोकराव माने, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार ऋतुराज पाटील, कुणाल पाटील व उल्हासदादा पवार तसेच यशराज शंभूराज देसाई, नवनाथ बन, विश्वास पाठक, किरण शेलार, मुश्ताक अंतुले, आयपीएस दीक्षित गेडाम, डीसीपी अशोक दुधे, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी पळसकर, आचार्य पवन त्रिपाठी, राजाराम देशमुख, सचिन सावंत, समित कदम, दै. पुढारीच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर, एमएमआरडीचे शंकर देशपांडे आदींनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.