Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"शासकीय महिला कर्मचाऱ्यावर घरात घुसून अत्याचार; आरोपीची क्रूरता आणि अमानुष छळ, परिसरात खळबळ."

​"शासकीय महिला कर्मचाऱ्यावर घरात घुसून अत्याचार; आरोपीची क्रूरता आणि अमानुष छळ, परिसरात खळबळ."


विजयवाडा: आंध्र प्रदेशातील माचेर्ला शहरात गुरुवारी दुपारी माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका ३२ वर्षीय महिला शासकीय कर्मचाऱ्यावर बलात्कार केला.

नराधमाने केवळ बलात्कारच केला नाही, तर महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई खुपसली आणि बेदम मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका शासकीय विभागात परिचर म्हणून काम करते. ती पतीपासून वेगळी राहते. गेल्या वर्षी ती सत्तेनपल्ली येथून माचेर्ला येथे राहायला आली होती. तिच्यासोबत तिचा भाचा राहत होता, मात्र दहावीच्या परीक्षेनंतर तो आपल्या कुटुंबीयांकडे सत्तेनपल्लीला गेला होता. 

गुरुवारी दुपारी ती घरी एकटीच असताना एका अज्ञात व्यक्तीने दरवाजा ठोठावला आणि पिण्यासाठी पाणी मागितले. पीडितेने मदतीच्या भावनेने पाणी दिले. यावेळी आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. त्याने महिलेचे हात पाय ओढणीने बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

गुप्तांगात लोखंडी सळई खुपसली

नराधमाचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने महिलेला बेदम मारहाण केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पीडितेने आपल्याला संसर्गजन्य आजार असल्याचे सांगितले, तरीही नराधमाने तिचे ऐकले नाही. आरोपीने तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई खुपसली, यामुळे तिच्या गुप्तांगातून रक्त वाहू लागले तरीही नराधम तिच्यावर अत्याचार करत राहिला.

घटना उघडकीस कशी आली?
पीडितेचा भाचा तिला वारंवार फोन करत होता, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने संशयावरून नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले असता महिला बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीने गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.