सांगली: जिल्ह्यामध्ये नशेच्या पदार्थांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा परिसरात मोठी कारवाई केली आहे. मानवी आरोग्यास घातक ठरणारी आणि नशेसाठी वापरली जाणारी ७४ 'ट्रेमीमाईड' इंजक्शन्स जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.
महत्त्वाची माहिती
जप्त मुद्देमाल: ७४ इंजेक्शन बाटल्या आणि एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकलएकूण कारवाईची किंमत: १,२६,७६६ रुपयेसांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अवैध नशिल्या पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्तीवर असताना, आष्टा येथील 'पाणगे मळ्यातील श्रीराम नाष्टा सेंटर' समोर दोन तरुण नशेची इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विनापरवाना ७४ इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या.
अटक केलेले आरोपी
१) अभिषेक भीमराव सरपदे (वय २६, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा)
२) रेहान रफीक मुजावर (वय २०, रा. गोडे चौक, आष्टा)
'इंडिया मार्ट'वरून मागवली होती इंजेक्शन
पोलिसी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी ही इंजेक्शन 'इंडिया मार्ट' (India Mart) या ऑनलाइन ॲप्लिकेशनवरून मागवली होती. ही इंजेक्शन ते सांगलीतील तरुण वर्गाला नशेसाठी चढ्या दराने विकणार होते.पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत. सांगली पोलिसांचे आवाहन: तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या अशा गुन्हेगारांबाबत काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.