सांगली :- जिद्द, चिकाटी आणि सततच्या परिश्रमाच्या जोरावर यश खेचून आणता येते, हे सांगलीच्या सौ. सुप्रिया निखिल काळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या B.Ed. अंतिम वर्षाच्या परीक्षेत सुप्रिया यांनी तब्बल ९१.९२% गुण प्राप्त करत संपूर्ण विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये (गुणवत्ता यादी) तृतीय (३ रा) क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुप्रिया काळे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते/परममित्र श्री. नितीन काळे यांच्या स्नुषा (सून) असून, त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत अत्यंत प्रतिकूल व कठीण परिस्थितीत अभ्यासाचे नियोजन केले होते. दिवस-रात्र घेतलेले अपार कष्ट आणि अभ्यासातील सातत्य याच्याच जोरावर त्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
महिलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मारलेली ही गरुडभरारी इतर अनेक गृहिणी आणि विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. सुप्रिया काळे यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सांगलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी, नातेवाईकांनी व स्नेहीजनांनी काळे परिवाराचे विशेष अभिनंदन केले असून, सुप्रिया यांच्या भावी शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत."सुप्रिया यांनी अत्यंत कष्ट आणि चिकाटीने B.Ed. परीक्षेत ९१.९२% गुण मिळवून शिवाजी विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवला, हा संपूर्ण काळे परिवारासह सांगलीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. त्यांच्या या यशाने कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे."— श्री. नितीन काळे व परिवार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.