🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंदापूर सुन्न! रक्षकच बनला भक्षक; ६७ वर्षीय आजोबाची वासनांध नजर आणि अल्पवयीन नातीचे उध्वस्त झालेले आयुष्य!

इंदापूर सुन्न! रक्षकच बनला भक्षक; ६७ वर्षीय आजोबाची वासनांध नजर आणि अल्पवयीन नातीचे उध्वस्त झालेले आयुष्य!


पुणे: आजोबा आणि नातीचे नाते प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे मानले जाते. मात्र, या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातून समोर आली आहे. गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत आजोबाने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती गतिमंद आहे. आरोपीला तिच्या परिस्थितीची माहिती असूनही त्याने या नात्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. घरात कोणी नसताना त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने तातडीने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शिवाजी चंद्रकांत दणाणे (वय 67, रा. भादलवाडी) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलता असल्याने या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नात्यांचा विश्वासघात करणाऱ्या या प्रकाराबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक भादलवाडी गावात पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.