🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मचाऱ्यांना जॅकपॉट, 18000 हून थेट 69000 रुपये वेतन? नवीन गणित तरी काय?

कर्मचाऱ्यांना जॅकपॉट, 18000 हून थेट 69000 रुपये वेतन? नवीन गणित तरी काय?

8 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांहून थेट 69,000 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आला आहे. याविषयीची मागणी करण्यात येत असल्याने चर्चा वाढली आहे.

अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 3.833 फिटमेंट फॅक्टरची आग्रही मागणी धरली आहे. पण मूळ वेतनाचा 69,000 हा आकडा केवळ फिटमेंट फॅक्टरवर आधारीत नाही. काय यामागील ते गणित? खरंच इतका पगार वाढणार का?

किमान 69,000 रुपयांचे गणित समजून घ्या

राष्ट्रीय परिषद- संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या (NC-JCM) कर्मचारी पक्षाने किमान वेतनात, मूळ वेतनातील बदलाची आग्रही मागणी केली आहे. केवळ फिटमेंट फॅक्टर हा घटक ग्राह्य धरण्याऐवजी इतर गोष्टींचा आधार घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती महागाई आणि उंचावलेले जीवनमान यासाठी लागणारा खर्च पाहता काही सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावात एनसी-जेसीएमने कुटुंबाचा आकार, घर, खाणे-पिणे, विद्युत, पाणी, इंधन आणि विकास कौशल्यासाठी लागणारा खर्च पुन्हा नव्याने जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

69,000 रुपये मूळ वेतनासाठी युक्तीवाद काय?

NC-JCM च्या कर्मचारी गटाने दिलेल्या निवेदनानुसार, किमान वेतन निश्चित करण्यासाठी सध्याचे सूत्र, फॉर्म्युला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, खर्चासाठी अजिबात पुरेसा नाही. कुटुंबाचा आकार बदलला आहे. 7 व्या वेतन आयोगाने वेतन निश्चित करताना 3 सदस्यीय कुटुंब ग्राह्य धरले होते. यामध्ये कर्मचारी, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश होता. पण आता ही सदस्यसंख्या पाच युनिट करणे गरजेचे आहे. आई-वडिलांचाही समावेश कुटुंबात करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याचे आई-वडीलच नाही तर सासू-सासऱ्यांचाही त्यात समावेश असावा. त्याच आधारे मूळ वेतन निश्चित करण्यात यावे.

3.833 फिटमेंट फॅक्टरची चर्चा

सहा सदस्यीय कुटुंबाची आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्याआधारे NC-JCM ने कर्मचारी वर्गासाठी किमान 69,000 रुपये वेतनाची मागणी केली आहे. सध्या किमान वेतन 18,000 रुपये इतके आहे. मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढवल्यास फिटमेंट फॅक्टर 3.833 इतके होते. यामुळे सरकारला फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा सुधारणाक करावी लागणार आहे. सध्या 2 ते 2.5 असे फिटमेंट फॅक्टर चर्चेत आहे. त्यापेक्षा ही मागणी अधिक आहे. 7 व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तज्ज्ञानुसार, महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर असू शकते. तर देशातील विविध कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची आग्रही मागणी केलेली आहे. औद्योगिक कामगारांसाठी महागाई निर्देशांक (AICPI-IW) आधारे फिटमेंट फॅक्टर ठरतो. नवीन वेतन आयोगाने ही शिफारस ग्राह्य धरल्यास कर्मचाऱ्यांना मोठा जॅकपॉट लागू शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.