🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रावण स्पेशल शॉपिंग फेस्ट! सांगलीत २२ आणि २३ ऑगस्टला ‘ऐशानी एक्झिबिशन’चा थाट; खरेदी आणि खाद्यजत्रेची रंगत

श्रावण स्पेशल शॉपिंग फेस्ट! सांगलीत २२ आणि २३ ऑगस्टला ‘ऐशानी एक्झिबिशन’चा थाट; खरेदी आणि खाद्यजत्रेची रंगत

सांगली :-श्रावण महिन्यातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांसाठी खरेदीची पर्वणी चालून आली आहे. अजिंकियन वूमन फाउंडेशनच्या वतीने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी नेमिनाथ नगर येथील राजमती भवन येथे भव्य ‘ऐशानी एक्झिबिशन’ चे आयोजन करण्यात आले आहे.
​भाजपा महिला मोर्चा सांगली ग्रामीण जिल्हा प्रभारी सौ. रेणुकाताई देशमुख यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

​प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:

​नवीन ट्रेंड्स व फॅशन: ट्रेंडी कपडे, वेस्टर्न व ट्रॅडिशनल वेअरचे खास कलेक्शन्स.
​आकर्षक दागिने व होम डेकोर: पारंपरिक व आधुनिक ज्वेलरी, हँडिक्राफ्ट्स आणि गृहसजावटीच्या वस्तू.
​फूड स्टॉल्स: विविध खाद्यपदार्थांची आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल.

​महिला सक्षमीकरण: स्थानिक महिला उद्योजिकांच्या कलागुणांना व व्यवसायाला व्यासपीठ.
​"स्थानिक महिला उद्योजिकांना पाठबळ देण्यासाठी आणि श्रावणातील खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सांगलीकरांनी आपल्या कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी."
— सौ. मंजिरीताई गाडगीळ (संस्थापिका, अजिंकियन वूमन फाउंडेशन)
​महत्त्वाची माहिती:
​दिनांक: २२ आणि २३ ऑगस्ट २०२६
​ठिकाण: राजमती भवन, नेमिनाथ नगर, सांगली
​खास आकर्षण: फॅशन • दागिने • फूड • होम डेकोर • महिला उद्योजिकांची उत्पादने

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.