मिरज पंचायत समिती भाजपच्या ताब्यात; मविआसह खासदार विशाल पाटलांना दणका!


सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली. मागील निवडणुकीत बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने यावेळी राजकीय डावपेच यशस्वी करत सत्ता हस्तगत केली आहे.

मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत यावेळी भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपाच्या राणी भोरे यांची सभापतीपदी, तर शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

मागील निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने प्रभावी रणनीती आखली होती.भाजपाच्या काही मित्रपक्षांना आपल्या बाजूने वळवत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले होते.मात्र विजयानंतर माजी खासदार संजयकाका पाटलांनी, खासदार विशाल पाटलांवर,जोरदार निशाणा साधला आहे. 

सत्तेची समीकरण बदलले महाविकास आघाडीच्या बाजूला गेलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष ज्यामध्ये विद्यमान उपसभापती हे देखील भाजपाच्या बाजूने गेल्याचे पाहायला मिळालं,या जोरावर नव्या निवडीत भाजपाने सत्ता हस्तगत करत मागील पराभवाचा वचपा काढला.तर महाविकास आघाडीसह खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.