हसतमुख तरुण काळाच्या पडद्याआड: अक्षय विष्णुपंत सूर्यवंशी यांचे अकाली निधन; दोन लहान मुलींनी गमावले छत्र
सांगली :- सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सिद्धेश उर्फ अक्षय विष्णुपंत सूर्यवंशी (वय ३२) यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने सूर्यवंशी कुटुंबावर आभाळच फाटले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अक्षय हे विष्णुपंत सूर्यवंशी यांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक बहीण, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी अक्षयने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबाचा मुख्य आधारच हरपला आहे. लहानग्या मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्याने आणि तरुण मुलाच्या जाण्याने सूर्यवंशी कुटुंब या मोठ्या आघातातून हादरून गेले आहे. एक हसतमुख आणि उमदा तरुण अशा अवेळी एक्झिट घेईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
'सांगली दर्पण' परिवारातर्फे अक्षय सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.