सांगली :- आपत्कालीन परिस्थितीत एका फोन कॉलवर मदतीला धावून जाणाऱ्या 'डायल ११२' (ERSS) सेवेत सांगली पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी केली आहे. जुलै २०२६ या एकाच महिन्यात सांगली पोलिसांनी अवघ्या ४ मिनिटे ११ सेकंदांच्या सरासरी वेळेत नागरिकांपर्यंत मदत पोहोचवून तत्परतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
जुलै महिन्यात ३,३४१ कॉल्सवर तात्काळ कारवाई
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या संकल्पनेतून पोलीस, अग्निशमन आणि वैद्यकीय मदतीसाठी एकाच 'डायल ११२' या एकात्मिक आपत्कालीन क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे.
एकूण प्राप्त कॉल्स: ०१ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सांगली नियंत्रण कक्षास ३,३४१ कॉल्स प्राप्त झाले.
शून्य प्रलंबितता: आलेल्या सर्व कॉल्सवर तात्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्यात आली असून एकही कॉल प्रलंबित राहिला नाही.
विक्रमी वेळ: राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली पोलिसांची ०४:११ मिनिटांची सरासरी प्रतिसाद वेळ सर्वोत्तम ठरली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम साथ
GPS प्रणाली, मोबाईल डेटा टर्मिनल (MDT) आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्षाच्या प्रभावी वापरामुळे घटनेच्या ठिकाणापासून सर्वात जवळ असलेल्या 'Emergency Response Vehicle' (ERV/FRV) ला त्वरित संदेश पाठवला जातो. यामुळेच पोलीस अत्यंत कमी वेळेत थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत."नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक आपत्कालीन कॉलला तात्काळ प्रतिसाद देणे हे पोलीस दलाचे कर्तव्य असून, कोणत्याही संकटाच्या वेळी नागरिकांनी निःसंकोचपणे ११२ क्रमांकावर संपर्क साधावा."— श्री. तुषार दोषी (पोलीस अधीक्षक, सांगली)सक्षम मार्गदर्शनाखाली यशही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि 'डायल ११२' नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री. बयाजीराव कुरळे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साध्य झाली आहे.'डायल ११२' वर कोणत्या वेळी संपर्क साधाल?रस्ते अपघात आणि वैद्यकीय आणीबाणीमहिला व बालकांवरील अत्याचारमारामारी, चोरी, दरोडा किंवा गुन्हेगारी घटनासंशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीआग लागणे किंवा नैसर्गिक आपत्तीसांगली पोलिसांचे आवाहन"आपली सुरक्षा, आमची जबाबदारी" या ब्रीदवाक्याला जागून सांगली पोलीस दल २४x७ सेवेसाठी सज्ज आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता डायल ११२ वर त्वरित संपर्क साधावा. तुमचा एक फोन वेळेत मदत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.