केंद्रीय मंत्र्यांचा दररोज एका विद्यापीठाचा दौरा;'जेन झी'बरोबर संवाद साधण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय
पी टी आय, नवी दिल्ली :-'जेन झी'पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखत आहे. 'एक दिवस, एक विद्यापीठ' या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणे आणि देशासमोरील मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणे हा या योजनेमागील उद्देश आहे.
नीट पेपरफुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले होेते. 'जेन झी' तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
सरकार काय करणार?
' 'एक दिवस, एक विद्यापीठ' या कार्यक्रमांतर्गत, नियुक्त केंद्रीय मंत्री संबंधित विद्यापीठाला भेट देतील.
' विद्यापीठात मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, विविध विषयांवरील त्यांची मते जाणून घेतील आणि त्यांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची- विशेषत: युवा आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती देतील.
' या भेटींसाठी विद्यापीठे आणि मंत्री यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.