🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष


मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आता मंत्र्यांची डिजिटल कामगिरी तपासली जात आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांचे डिजिटल रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.

१ मे ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील सोशल मीडिया आकडेवारी तपासण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

मंत्र्यांचे सोशल मीडिया आकाऊंट तापसले

सोशल मीडियावरील रीच आणि एंगेजमेंटच्या बाबतीत पंतप्रधान पहिल्या क्रमांकावर राहिले असून सर्व मंत्र्यांच्या फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट तपासून त्यावरील लाईक्स व फॉलोअर्सचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. केवळ पदावर राहून चालणार नाही, तर जनतेशी थेट आणि सातत्याने संवाद साधावा लागेल, असे पंतप्रधानांनी मंत्र्यांना स्पष्ट केले आहे.

हा आढावा केवळ फॉलोअर्स मोजण्यापुरता मर्यादित नव्हता, तर कोणता मंत्री डिजिटल विश्वात जनतेशी किती प्रभावीपणे जोडला जात आहे हे पाहण्यासाठी घेण्यात आला. यामध्ये दररोजच्या पोस्ट आणि सरासरी एंगेजमेंटचे मूल्यांकन करण्यात आले. ज्या मंत्र्यांची डिजिटल कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी भरली आहे, त्यांना कार्यपद्धती सुधारण्याचा इशारा देण्यात आलाय.


पंधरा दिवसांचा डेटा

या डिजिटल रिपोर्ट कार्डच्या तपासणीसाठी १ मे ते १५ ऑगस्ट या काळातील प्रत्येक पोस्टचा मागोवा घेण्यात आला. मंत्र्यांकडून दररोज सरासरी किती पोस्ट केल्या जात आहेत आणि त्यावर नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. केवळ लाईक किंवा शेअर नव्हे, तर फॉलोअर्ससोबतचा थेट संवाद महत्त्वाचा मानला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.