🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युक्तिवादाचं अखेरचं वाक्य, कपिल सिब्बलांचा मास्टरस्ट्रोक, घाव घातला, धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा!

युक्तिवादाचं अखेरचं वाक्य, कपिल सिब्बलांचा मास्टरस्ट्रोक, घाव घातला, धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा!

मुंबई : शिवसेना पक्ष ठाकरेंचा आहे, तो एकनाथ शिंदे यांचा पक्ष होऊच शकत नाही. त्यामुळे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांचे होऊच शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मोठी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली.

पक्ष कुणाचे आणि चिन्ह कुणाचे असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आणि त्यावर गेली चार वर्षे कायदेशीर खल सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या युक्तिवादाच्या अखेरच्या क्षणी धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. त्याआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाने घालून दिलेले नियम कसे पायदळी तुडवले, हे सांगण्याचा प्रयत्न सिब्बल यांनी केला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (आज) महत्त्वाची सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेली आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी काल बहुप्रतिक्षित युक्तिवाद केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्र ठरवण्यास नकार दिलेल्या या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.

...तर धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे

जर त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळू शकत नसेल आणि आम्हालाही ते चिन्ह मिळू शकत नसेल, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवले पाहिजे. हा माझा पर्यायी युक्तिवाद आहे. ज्या लाभाचा उपभोग घेण्याचा त्यांना (एकनाथ शिंदे) कधीच हक्क नव्हता, त्याच लाभावर एकनाथ शिंदे यांचा गट न्यायाचा दावा करू शकत नाही, असे सिब्बल म्हणाले.



आम्हालाही मिळू शकत नसेल आणि त्यांनाही नाही तर धनुष्यबाण गोठवा- कपिल सिब्बल


कृपया 'दहाव्या अनुसूची'चा अर्थ असा लावू नका की ज्यामुळे पक्षांतर करण्यास मुभा मिळेल; कारण तसे करणे हा एक प्रकारचा गुन्हाच ठरेल. कर्नाटक प्रकरणातील निकालातही हेच नमूद केले आहे. जर तुम्ही असे म्हणत असाल की १९ जुलै नंतर त्यांना (शिंदे गटाला) इतका पाठिंबा मिळाला आहे, तर तुम्ही अप्रत्यक्षपणे पक्षांतरालाच प्रोत्साहन देत आहात. मी माननीय न्यायालयाला विनंती करतो की, 'शिवसेना' हे नाव ठाकरे यांच्याच मालकीचे आहे आणि शिंदे गटाला ते पक्षचिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा वापर करणे ही काही न्याय्य हक्काची बाब नाही; तो त्या चिन्हाचा अनधिकृत वापर आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले पाहिजे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि आम्हालाही मिळू शकत नसेल, तर ते गोठवणे हाच एकमेव पर्याय उरतो. एखादी बेकायदेशीर कृती करून ते स्वतःसाठी कोणताही कायदेशीर किंवा न्याय्य हक्क निर्माण करू शकत नाहीत, असे सिब्बल म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.