तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे? 1 जुलैपासून IFSC कोड बदलणार, जुनं चेकबुक रद्द होणार..
मुंबई: काही दिवसांपूर्वीच सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यामुळे आता बँकेच्या व्यवहारात मोठे बदल होणार आहे. परिणामी सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कॅनरा बँकेने सिंडिंकेट बँकेचा IFSC कोड बदलला असून नवा कोड 1 जुलैपासून वापरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकचा वापर करून व्यवहार करायचे असल्यास फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर सिंडिकेट बँकेचे चेकबुक हे निरुपयोगी ठरेल.
किती काळ जुना आयएफएससी कोड वैध असेल?
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार जुन्या बँकेच्या म्हणजेच सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड 1 जुलैपर्यंत वैध राहतील. यानंतर नव्या आयएफएससी कोडद्वारे पैशांचा व्यवहार केला जाईल. जर आपल्याला कोणी पैसे पाठवणार असेल तर त्यांना आयएफएससी कोड बदलल्याचे आधीच कळवा, जो बँक तपशिलात बदलला जावा. अन्यथा पैसे हस्तांतरीत करणे कठीण होऊ शकते.
आपण सिंडिकेट बँकेचे ग्राहक असल्यास आपल्याला नवीन आयएफएससी कोड कसा शोधायचा हे जाणून घ्यावे लागेल आणि बँकेचा जुना आयएफएससी कोड किती काळ वैध राहील हे सांगावे लागेल. आयएफएससी कोडच्या शेवटच्या तारखेनंतर खात्यात पैसे येणे बंद होईल.
नवीन कोड कसा शोधायचा?
नवीन कोड शोधण्यासाठी आपण कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. येथे बँकेने मुख्य पृष्ठावरच आयएफएससी कोडला एक दुवा दिला आहे, ज्यावर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता. या लिंकवर क्लिक करून आपल्यासमोर एक डॉक्युमेंट फाईल उघडेल. येथे क्लिक करून आपण थेट पीडीएफवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला जुना आयएफएससी कोड, नवीन आयएफएससी कोड, बँक कोड, शाखा कोड, बँकेचे नाव, शाखेचे नाव, शहराचे नाव, शाखेचा पत्ता, एमसीआर कोड, जिल्हा, राज्य यांची माहिती देण्यात आली आहे.
बँकेचा इशारा काय आहे?
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही आपणास विनंती करतो की सेंडर्सला NEFT/RTGS/IMPS मार्फत पैसे पाठविताना फक्त 'CNRB'चा नवीन आयएफएससी कोड वापरा. अधिक माहितीसाठी आपण https://canarabank.com/IFSC.html वर भेट देऊ शकता आणि कोणत्याही कॅनरा बँक शाखेशी संपर्क साधू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.