Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोलकरीण महिलांची निवारा भवन येथे व्यापक बैठक!

  मोलकरीण महिलांची निवारा भवन येथे व्यापक बैठक!

ज्या मोलकरीण महिलांना covid-19 टाळेबंदी काळातील पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य अद्याप मिळाले नाहीत त्यांना त्वरीत आर्थिक सहाय्य द्या या मागणीसाठी गुरूवार दिनांक १ जुलै रोजी ठीक दुपारी दोन वाजता मोलकरीण महिलांची निवारा भवन येते व्यापक बैठक!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोलकरीण महिलांना कोविद १९ साठी लॉक डाऊन मध्ये तातडीने आर्थिक सहाय्य म्हणून पंधराशे रुपये देण्याचे घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये सुमारे पाचशे महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे. उर्वरित महिलांना ही मदत मिळण्यासाठी ज्यानी मोलकरीण महिला म्हणून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी केलेली आहे. त्यांनी मोलकरीण म्हणून नोंदणी केल्याची कागदपत्रे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ओळखपत्राची झेरॉक्स व वर्गणी भरण्याची झेरॉक्स दाखल करणे आवश्यक आहे. म्हणूनच याबाबत आज सांगली निवारा भवन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, गुरुवार दिनांक १ जुलै रोजी ठीक दुपारी दोन वाजता सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांची बैठक निवारा भवन सांगली येथे घेण्यात येईल. दरम्यान महिलांची आवश्यक कागदपत्रे घेण्याचे कामकाज सांगली निवारा भवन येथे सुरू राहील. तसेच मोलकरीण महिलांना नवीन ओळखपत्र काढून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ सर्व मोलकरीण महिलांना घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मोलकरीण महिलांच्या मेळावा तयारीसाठी 28 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉ शंकर पुजारी, कॉ,, विजय बचाटे, कॉ सुमन पुजारी व विशाल बडवे इत्यादी नी महत्त्वाची भागीदारी केली.असे पत्रक सांगली जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने कॉ सुमन पुजारी यांनी प्रसिध्दीस दिले आहे. आजही लॉक डाऊन मध्ये सर्वात जास्त हाल मोलकरीण महिलांना सोसावे लागत असल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंब आज रोजगार नसल्यामुळे अर्धपोटी जीवन जगत आहेत.

जरी मोलकरीण महिलांनी 2011 सालानंतर स्वतःच्या काढलेल्या ओळखपत्राचे नूतनीकरण केलेले नसले तरीसुद्धा 30 एप्रिल 2021 पर्यंत महिलांनी ओळखपत्र काढलेले असेल त्या सर्वांना हे १५०० रूपये आर्थिक सहाय्य मिळणार आहेत

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या मोलकरणी महिलांना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे यादीमधील अनेक महिलांच्या बँकेतून रक्कम परत आलेली आहे कारण त्यांच्या अकाउंट बंद आहे किंवा त्याच्यामध्ये त्रुटी आहेत तरी याबाबतही पूर्तता मोलकरणी महिला ने करून देणे आवश्यक आहे त्यासाठी बुधवार दिनांक १/७/२०२१ ठीक दुपारी दोन वाजता सांगली निवारा भवन येथे महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे तरी या बैठकीस सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

या 28 जून रोजी सायंकाळी पाच वाजता तयारीच्या बैठकीमध्ये कॉ शंकर पुजारी, कॉ विजय बचाटे, कॉ सुमन पुजारी, कॉ वर्षा गडचे कॉ विशाल बडवे इत्यादींनी महत्वाची भागीदारी केली. असे पत्रक सांगली जिल्हा घरकामगार मोलकरणी महिला संघटनेच्या वतीने कॉ सुमन पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.