नेव्हीमध्ये अधिकारी व्हायची संधी; जाणून घ्या कधी करु शकता अर्ज ?
नवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय नौसेनामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमचं हे स्वप्न लवकरचं पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण आज या लेखामधून आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत, ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी ठरु शकते.
अलिकडेच इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या आधारावर इंजिनिअर पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 जूनपासून सुरु झाली आहे. ही मुदत 26 जूनपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी इच्छूक उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट https://www.joinindiannavy.gov.in/ वर जाऊन भेट देऊ शकतात.
याशिवाय NDA/NA (2) 2021 Exam साठी देखील 9 जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आलं आहे. जर तुम्ही देखील सेना आणि नौसेना अकॅडेमीमध्ये अधिकारी होऊन देशाची सेवा करु इच्छित असाल तर NDA तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. याबाबतची अधिक माहिती आपल्याला अधिकृत साईट https://upsc.gov.in/ वर मिळू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.